मुख्य यार्ड, रिसोड

रिसोड बाजार समिति अंतर्गत १४ एक्कर २८ गुंठे क्षेत्रफळाचे मुख्य यार्ड आहे. या मुख्य यार्ड मध्ये तीन ऑक्शन ओटे आहेत. या तीन ऑक्शन ओट्यांवर सोयाबीन, तूर, चना, उडीद, मुंग, हळद व चिया या शेतमालाची हराशी होते. या मुख्य यार्ड मध्ये खालील सुविधा पुरविण्यात येतात.
०१) विद्युत व्यवस्था, ०२) टीनशेड सह धान्य ओटा, ०३) कार्यालयीन दुमजली इमारत, ०४) शेतकरी निवास ०५) डांबरीकरण रोड, ०६) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ०७) गोडावून, ०८) गुरांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ०९) शॉपिंग कॉम्प्लेक्स १०) बाजार समितीचे मुख्य यार्ड मध्ये एम.ए.सी.पि. (महा.स्पर्धाक्षम) योजनेअंतर्गत शेतमाला करीता हळदीचा ऑक्शन ओटा व उत्तर दक्षिण सिमेंट कॉंक्रिट रोड,गोडावून,शॉपकम दुकाने इत्यादी ११) समितीने हमाल मापाऱ्यांचे सुविधे करीता हमाल भवन बांधलेले आहे, १२) ५० टनी प्लेट वे ब्रिज काटा, १३) बाजार समितीने धान्य ओट्यावर शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोजमाप जलद गतीने होण्याचे दृष्टीने समिती धान्य ओट्यावर ६५ नग इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी केले आहेत.
बाजार समितीचे आवारात पूर्णपणे चोहोबाजूने बंद करून मुख्य गेट मधून शेतमालाची आवक जावक होते. जावक मालाची नोंद घेण्यास समितीचे कर्मचारी कार्यरत असून जाणाऱ्या मालावरील मार्केट फी वसुलीवर नियंत्रण ठेवण्यात येते.