बाजार विभाग

प्रशासन विभाग

विभाग प्रमुख - सचिव
विभागाची भूमिका व कार्य :-

  • बाजार समितीचा मुख्य प्रशासकीय विभाग
  • संचालक मंडळाचे निर्णय अंमलात आणणे
  • सभांचे आयोजन व इतिवृत्त तयार करणे
  • शासन आदेश, परिपत्रके व निर्देशांची अंमलबजावणी
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण
  • न्यायालयीन प्रकरणे व शासकीय पत्रव्यवहार

लेखा विभाग

विभाग प्रमुख - लेखापाल
विभागाची भूमिका व कार्य :

  • बाजार समितीचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणे
  • वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
  • उत्पन्न व खर्चाची नोंद ठेवणे
  • लेखापरीक्षण (Audit) व अहवाल सादर करणे
  • बिले, देयके व अनुदान वितरण
  • शासनास आर्थिक अहवाल सादर करणे

रोखपाल विभाग

विभाग प्रमुख - रोखपाल
विभागाची भूमिका व कार्य:

  • रोख रक्कम स्वीकारणे व देणे
  • रोजचा रोख हिशोब ठेवणे
  • बँकेत रक्कम जमा करणे
  • पावत्या देणे
  • लेखा विभागाशी समन्वय साधणे

आस्थापना विभाग

विभाग प्रमुख – कार्यालयीन अधीक्षक
विभागाची भूमिका व कार्य:

  • कर्मचारी भरती, नेमणूक व सेवा नोंदी
  • रजा, वेतनवाढ, पदोन्नती विषयक कामकाज
  • सेवांतर्गत चौकशी व शिस्तभंग कारवाई
  • निवृत्ती, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन प्रकरणे
  • कर्मचारी प्रशिक्षण व कार्यक्षमता विकास

भूखंड विभाग

विभाग प्रमुख - भूखंड अधिकारी
विभागाची भूमिका व कार्य :

  • बाजार समितीच्या मालकीच्या भूखंडांचे व्यवस्थापन
  • गाळे/दुकाने/भूखंड वाटप
  • भाडे, करारनामा व नूतनीकरण
  • अतिक्रमण नियंत्रण
  • बांधकाम परवानगी व नोंदी

निरीक्षक विभाग

विभाग प्रमुख - निरीक्षक
विभागाची भूमिका व कार्य :

  • बाजारातील व्यवहारांवर देखरेख
  • वजन-मापांची तपासणी
  • नियमांचे पालन होत आहे की नाही याची खात्री
  • व्यापारी व अडत्यांची तपासणी
  • तक्रारींची चौकशी

अनुज्ञप्ती विभाग

विभाग प्रमुख : अनुज्ञप्ती अधिकारी
विभागाची भूमिका व कार्य :

  • व्यापारी, अडते, हमाल, मापारी यांना परवाने देणे
  • अनुज्ञप्ती नूतनीकरण
  • परवाना रद्द / निलंबन प्रक्रिया
  • अनुज्ञप्ती शुल्क व नोंदी
  • परवानाधारकांची अद्ययावत यादी ठेवणे

सेस विभाग

विभागाची भूमिका व कार्य :

  • बाजार शुल्क (सेस) आकारणी
  • सेस वसुली व नोंदी
  • थकीत सेस वसुली
  • सेस संबंधित अहवाल तयार करणे
  • शासनास सेस विवरण सादर करणे

आवक - जावक विभाग

विभागाची भूमिका व कार्य :

  • बाजारात येणाऱ्या व जाणाऱ्या मालाची नोंद
  • शेतमाल आवक-जावक अहवाल तयार करणे
  • दैनंदिन, मासिक व वार्षिक आकडेवारी
  • दरपत्रक व बाजार माहिती संकलन
  • शासन व शेतकऱ्यांना माहिती पुरवठा

छपाई व लेखन सामग्री विभाग

विभागाची भूमिका व कार्य :

  • छपाई साहित्य व्यवस्थापन
  • कार्यालयीन लेखन सामग्री खरेदी व वाटप
  • फॉर्म, रजिस्टर, पावत्या छपाई
  • साठा नोंद ठेवणे
  • संबंधित बिलांचे व्यवस्थापन